दुसर्‍या दिवशीही मनपाकडून अनधिकृत नळधारकांविरोधात कारवाई सुरू

Foto

औरंगाबाद: अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करण्याकरीता विशेष अभय योजना राबवल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने मनपा प्रशासनाच्या वतीने बुधवारपासून मुख्य जलवाहिनी वरील कनेक्शन तोडण्याची कारवाई हाती घेण्यात आली. आज गुरुवारी दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजेपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. 

शहरात एकूण १ लाख ३६ हजार नळ कनेक्शनची मनपा दप्तरी नोंद असून, लाखभर नळ अनधिकृत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात मुख्य जलवाहिनी वरून सर्रासपणे वापराकरिता नळकनेक्शन घेतलेली आहेत. अशा कनेक्शन द्वारे २४ तास पाण्याचा वापर करण्यात येतो.

 अशांना धारकांना पालिकेने अनेक वेळा आवाहन करूनही त्यांनी त्यांची नये अधिकृत केलेली नाहीत. या अनधिकृत व मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेशन धारकासमोर  पालिका प्रशासन हतबल झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसात उद्भवलेल्या पाणीटंचाई च्या माध्यमातून एक वेळ पाहायला मिळाले. परंतु बुधवारपासून अशा नळ धारका विरोधात मनपा प्रशासनाच्या वतीने जोरदार मोहीम हाती घेण्यात आली. या पहिल्याच दिवशी दीडशेवर नळकनेक्शन तोडल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजेपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. शहरात सुमारे सात पथकांचा माध्यमातून एकाच वेळी सात ठिकाणी कारवाई सुरू होती. 

दोन शिफ्टमध्ये काम
यावेळी कामगारांकडून नळ कनेक्शन तोडून घेण्यात येत आहे. परंतु कामगार केवळ आठ तास काम करू शकतो हे लक्षात घेता मोहिमेचा वेग कमी होऊ नये म्हणून सकाळी ६ ते २ व दुपारी २ ते रात्री १० आशा दोन शिफ्टमध्ये  कामगार बदलून काम केले जात आहे.